pub-7425537887339079
ब्रेकिंग

विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील खेळाडूंची दमदार कामगिरी; दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0 5 3 6 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील विंग्स कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत ग्रामीण भागातील दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

या स्पर्धेत निसार शकील शेख आणि रिहान सलीम सय्यद यांनी सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच अमित गणेश गायकवाड, आयान शकील शेख आणि पवन गजानन गावंडे यांनी रौप्यपदक पटकावून अकॅडमीच्या यशात भर घातली.

या सर्व खेळाडूंना विंग्स कराटे अकॅडमी, माहोरा येथील कराटे प्रशिक्षक दिनेश वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीच्या अध्यक्षा वैशाली दिनेश वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विभागीय स्तरावर यश मिळवत राज्यस्तरावर झेप घेण्याची संधी मिळवल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशामुळे माहोरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे