pub-7425537887339079
ब्रेकिंग

जवान सुधाकर इंगळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

सैन्य दलात १९९१ ते २०२६ अशी ३५ वर्षे देशाची निस्वार्थ सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जाफराबाद तालुक्यातील पापळ गावचे सुपुत्र सुधाकर सखाराम इंगळे यांचा ३ सप्टेंबर रोजी पापळमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

जवान इंगळे हे १९९१ साली

भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ४ एप्रिल १९९१ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे ४ महिने त्यांनी देशाच्या विविध सीमांवर, अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा बजावली आहे. निवृत्तीनंतर आज पहिल्यांदाच ते आपल्या मूळगावी पापळ येथे दाखल झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय यासह पापळ येथील ग्रामस्थ,

तरुणांनी त्यांची ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांचा वर्षाव करत सवाद्य मिरवणूक काढली. गावातील हनुमान मंदिरसमोरील प्रांगणात त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुधाकर इंगळे भावूक झाले. ते म्हणाले, मी १९९१ मध्ये देशसेवेसाठी घर सोडले होते. आज

२०२६ मध्ये ३५ वर्षांनंतर शरीराने निवृत्त झालो असलो, तरी मनाने आयुष्यभर सैनिकच राहणार आहे. येणाऱ्या काळात गावासह परिसरातील तरुणांनी देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मी कायम मार्गदर्शक म्हणून पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. तर आज पापळ गावासह तालुक्याने या सोहळ्यानिमित्त माझ्यावर जे प्रेम केले, त्याचा मला सार्थ अभिमान

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे