pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी गावात सुद्धा अठरा दिवसाला नळाला पाणी, नळाला पाणी कमी येताच, महिलांचा मोर्चा ग्रामपंचायतवर

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णीदत्ता देशमुख,दि.23

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, प्रभात तालुक्यातील सर्वात मोठी वस्ती, सतरा ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत, विविध योजना राबवण्यासाठी मुबलक अशी व्यवस्था, तरीसुद्धा गावामध्ये ग्रामपंचायतच्या नळाला पाणी हे 18 दिवसानंतर येते, नुकतेच नेते मंडळींनी ग्रामपंचायत मध्ये, गावात खडकपूर्णा धरणाची पाणी सुरू झाल्याचा गवगवा केलेला आहे. एवढा असून सुद्धा गावातील नळाला पाणी हे 18 दिवसानंतर येते. गावामध्ये हे एकूण 47 झोन असायला हवे. फोनची संख्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच माहीत नाही. तसेच सरळ झोन करण्यापेक्षा एका गल्लीतील अर्धा भाग दुसऱ्या दोनदा जोडल्यामुळे, पाण्याची ट्यूबलाईन काही भागांना पाणी येत नाही. 22 मे रोजी नळाला पाणी आले ते ब्राह्मण गल्ली व माळी गल्लीतील पंधरा घरांना. पाणी पंधरा ते वीस मिनिटे हे चालले नाही व नळ बंद झाले. एकतर 18 दिवसानंतर पाणी आले तेही अपूर्ण पाणी आल्यामुळे महिलांचा मोर्चा आणि काही ग्रामस्थांचा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर गेला. तिथे कोणीही संबंधित जबाबदार व्यक्ती त्यांना भेटला नाही. तसेच तिथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतः त्यांची उडवा-उडूंचे उत्तरे दिल्याचे आमच्या वृत्त प्रतिनिधीशी सांगितले. महिलांनी संध्याकाळी आणि आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर धावपळ सुरू झाली. कामाचे नियोजन हे ग्रामपंचायतला आता जमत नाही असे नागरिकांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. ज्यांच्याकडे असंख्य ग्रामपंचायतचा चार झाले असे अधिकारी असताना त्यांना कोणकोणत्या ग्रामपंचायतकडे लक्ष यावयाची याची योजना ठरवावी लागते. ग्राम विस्तार अधिकारी हा कायमस्वरूपी आणि पर्मनंट असला पाहिजे. मध्य स्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे गावांमध्ये त्यांचे कोणाकडेच लक्ष नाही. तसेच अनेक कार्यकर्ते हे विकासाच्या गप्पा मारताना मात्र पारावर दिसतात. काहींना विकासाच्या संदर्भात बोलल्यास गावातील कार्यकर्ते हे त्यांना राग येतो आणि नाराजी प्रस्थापित केल्या जाते आणि त्या व्यक्तीकडे विशेष लक्ष देऊन ते कार्यकर्ते त्यांच्यावर नजर ठेवतात. मोठ्या ग्रामपंचायतचा प्रश्न असताना सुद्धा विकास कामे फक्त कागदावरच दिसण्याची चित्र आता सध्या गावकऱ्यांना दिसत आहे. या महिलांमध्ये व पुरुषांमध्ये शोभा तांबेकर, मिराबाई शितोळे, कलावती पाबळे, मंगल मुनेमाणिक, राधा मुनेमाणिक, पल्लवी तांबेकर, कस्तुराबाई मुनेमाणिक, मुक्ता तांबेकर, पूजा तांबेकर, कावेराबाई धारे, सोमनाथ तांबेकर, श्रीकांत मुनेमाणिक, प्रथमेश मुनेमाणिक आदींनी ग्रामपंचायत वर मोर्चा नेला होता. संबंधित यंत्रणेचे कोणीही तिथे आढळले नाही. ग्रामपंचायत चे कार्य हे सेवा सुविधा पुरवणे असताना सुद्धा, कोणाच्यातरी धाकाने ही सुविधा पुरवल्या जात नसल्याची भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे