pub-7425537887339079
ब्रेकिंग

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0 4 2 1 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.28

सन 2026-2027 या वर्षामध्ये संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांकडे सिंचनाची सोय आहे, व ज्यांच्याकडे पशुधन आहेत अशा लाभधारकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. संभाव्य एल-निनो या हवामान घटकांचा प्रतिकुल परीणाम होण्याची शक्यता असलयाने चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणांसाठी इच्छूकांनी अर्ज करावेत. तसेच संभाव्य चारा टंचाई निर्माण होवु नये, व चारा छावण्याची वेळ पडू नये याकरीता आतापासुनच चारा निर्मीती व त्याच्या साठवणुकीबाबतचे अचुक नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्याकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वत: ची किमान 3 ते 4 जनावरे आहेत, अशा लाभधारकांना प्राधान्य देण्यात येईल. एका आर्थीक वर्षात एका लाभधारकांस एकदाच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 05 मे, 2026 पर्यत आपले अर्ज संबधीत आपल्या गावातील पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिप, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 1 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे