अतुल तिडके यांना महात्मा फुलेमहाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.12
अनथ सेवक सामाजिक कल्याण संस्थेच्या वतीने यंदाचा महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार पानेवाडी येथील अतुल मनोहर तिडके यांना देण्यात आला… आहिल्यानगर येथील अनथ सेवक सामाजिक कल्याण संस्था आहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार यावर्षी जालना जिल्ह्यातील पानेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल मनोहर तिडके यांना देण्यात आला यावेळी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध रिलस्टार राजश्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष तुषार बोरुडे व अतुल तिडके यांचे सावता तिडके नसीम शेख रावसाहेब अंभोरे महात्मा फुले प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष, भास्करराव आंबेकर विष्णू मगर संजय राऊत आदींनी अभिनंदन केले



