टेंभुर्णी राम नवमी चा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा महाकाल अघोरी यांनी जिंकले उपस्थितांचे मन. शेवटी महा प्रसाद ने सांगता.

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.31
टेंभुर्णी येथील गेल्या शेकडो वर्षापासून प्रभू रामचंद चे भव्य मंदिर असून येथील गावकरी यांच्या कडून येथे विविध कार्यक्रम घेतल्या जातात. सात दिवसांच्या मोठ्या कार्यक्रमानंतर शेवटी मोठा भंडारा करून सर्व गावकरी यांच्या साठी अन्नदांना चा मोठा कार्यक्रम पार पडला. गांवकरी यांच्या साठी शेवटी भव्य मिरवणूक काढून त्यात महाकाल अघोरी टीम मे हर हर महादेव म्हणून सर्व परिसर भक्तीमय करून टाकला होता.आंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने टेंभुर्णी शहरात प्रभु श्री राम नवमी च्या निमित्ताने भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.
शोभा यात्रे मध्ये महाकाल अघुरी चे जिवंत देखावे विशाल दंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले.या शोभा यात्रेची सुरुवात प्रभु श्री राम मंदिरापासून करण्यात आली होती माळी गल्ली, खालचे बस स्टॉप, मेन रोड, मार्गे दत्तनगर भागातील श्री रेणुका माता मंदिरावर शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमास भोकरदन जाफ्राबाद मतदार संघांचे आमदार श्री संतोष पाटील दानवे, जिल्हा परिषद सदस्य,श्री शालिकराम पाटील म्हस्के, सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के यांच्या सह
आंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते व सकल हिन्दू बांधव उपस्तिथ होते.या वेळी पोलिस मंडळी कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

