pub-7425537887339079
ब्रेकिंग

साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत. निष्ठा पाटील हिचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

निष्ठा प्रज्वल पाटील हिने दहावीत घवघवीत यश मिळविल्याने वहाळच्या साई मंदिरात तिचा गुरुवारी (ता. १४) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मो. का. मढवी गुरुजी, साई मंदिरचे संस्थापक-अध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इंटकचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची ती नात होय. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “वहाळच्या साई मंदिरचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे मी प्रभावित होऊन साई मंदिरात दरमहा अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आम्ही अन्नदान करतो, ते कायम सुरूच राहील. गेली अनेक वर्षे अव्याहतपणे हे काम रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा काबाडकष्ट करून वर आलोय, आई-वडिलांच्या मेहनतीमुळे, संस्कारामुळे आणि समाजाला देण्याच्या भूमिकेमुळे आजची माझी वाटचाल सुखकर आहे. आजघडीला मी जग पालथे घातले आहे, कैलास मानसरोवरापासून सर्व देवस्थाने पाहिली, पण मला देव मानसात दिसतोय.” यावेळी श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाकडी यांचे सुश्राव्य भजन झाले. जयवंत गंगाराम पाटील आणि जयश्री जयवंत पाटील यांना साई मंदिरात मंगलस्नान करण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे