pub-7425537887339079
ब्रेकिंग

खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार.

0 4 6 0 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या तर्फे उरण तालुका पोलीस ठाण्यात खानदेशवाशी नामांकित व कर्तबगार, अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले जगदीश शेलकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उरण येथे नेमणूक झाली म्हणून मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत व अभिनंदन उरण तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.कार्याध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, खजिनदार वामनराव राठोड, उपाध्यक्ष आनंद कुमावत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोबत मंडळ सहकारी सेक्रेटरी सचिन खैरनार,भरत पाटील, संजय पाटील, झोपे सर, दत्तु महाले आणि महिला प्रतिनिधी जयश्री महाजन ताई, राजेश्री वाडेकर व गोकुळ धाडी आदी पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सर्व सभासदांनी एकमेकांना परिचय व ओळख करून दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सुद्धाआपला परिचय व थोडक्यात आपल्या कार्याचा आढावा दिला व जिवनात सुख कसं निर्माण करता येईल याचा मुलमंंत्र सांगीतला. उरण पोलीस ठाण्यात नवीनच हजर झालेले पोलिस निरीक्षक ( गुन्हे शाखा ) राहुल रा.काटवाणी हे सुद्धा अमळनेर येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर सर्व पदाधिकारी मंडळींनी त्यांचीही सदिच्छा भेट घेतली व अभिनंदन केले.त्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला.अशा प्रकारे कार्यक्रमची आनंदाने सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे