pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालन्यातील भोकरदनमध्ये अवैध मद्यासह ७२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

- अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - आतापर्यंत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भोकरदन कार्यालयाने अवैध मद्य विक्री विरोधात विशेष मोहीम राबवून आज सकाळी केलेल्या कारवाईत १७.२८ बल्क लिटर देशी दारू आणि एक दुचाकी वाहन असा एकूण ७२ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एक गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी अहिरे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दि. ६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहिम राबवून आतापर्यंत एकूण ७३ गुन्हे नोंदविले. या कारवाईत ७० जणांना अटक करण्यात आली असून ४ लाख ६५ हजार ९४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे श्रीमती अहिरे यांनी कळविले आहे.

**

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे