pub-7425537887339079
ब्रेकिंग

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षेत पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.30

 जिल्ह्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे बैठकीत यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनांची स्थितीचा आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रशासनाला नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचे सांगुन पाणी वापरात काटकसरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. ज्या गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या.यावेळी बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे