फळ विक्रेत्याच्या मुलाने नीट परीक्षेत मिळवले ५४४ गुण ; माहोरा ग्रामस्थांनी केला सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवण्याचे उत्तम उदाहरण माहोरा ता. जाफ्राबाद, गावातून समोर आले आहे. येथील फळ विक्रेता नारायण बावणे यांचा चिरंजीव ओम कविता नारायण बावणे याने नीट परीक्षेत ५४४ गुण मिळवून एमबीबीएस प्रवेशासाठी पात्रता सिद्ध केली. आर्थिक अडचणी असतानाही ओमने शिक्षणाची आस सोडली नाही. त्याने प्राथमिक शिक्षण माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत पूर्ण केले. इयत्ता ५वीत जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथून नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने ६वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण परतुर तालुक्यातील आंबा येथे पूर्ण केले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माहोरा ग्रामसंसद कार्यालय आणि गजानन राजपूत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ओम बावणे याचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच गजानन पा. लहाने यांच्यासह माजी कृ.ऊ.बा.सभापती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, उपसरपंच भास्कर सोनुने, भगवानराव लहाने, सय्यद हबाब सय्यद कमाल, भानदास बोर्डे, दादाराव गडकरी, गणेशराव लहाने, लक्ष्मण वाघ गणेश गायकवाड, रामदास मोरे भिमराव बोर्डे, आदी मान्यवर सह गजानन राजपुत मित्र मंडळातर्फे नवलसिंग जाधव, सुरेश वाघ, चंद्रकांत चौतमोल, विजय कासोद, कुलदीप लवगे, विलास कासोद, भानदास मुठे, शरद मुळे, पंकज जाधव, केशव मकवाने, कैलास लहाने, दिगंबर ढवळे, अंकुश जाधव, संतोष वरपे, बाळु कासोद, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ओमच्या आई-वडिलांचा देखील शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गावाचा मुलगा डॉक्टर होतोय ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. भावी डॉ. ओम बावणे यांना पुढील वाटचालीसाठी सरपंच सह गजानन राजपुत मित्र ग्रामस्था कडुन शुभेच्छा देण्यात आल्या.




