pub-7425537887339079
ब्रेकिंग

माहोरा–जालना बस सेवेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त चालक-वाहकांचा सत्कार

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.23

जालना विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अधिपत्याखाली जाफराबाद आगारातून सुरू असलेली माहोरा–जालना (मार्गे बरंजळा साबळे, नळणी खुर्द, जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, राजूर) ही बस सेवा यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण करून दुसर्‍या वर्षात पदार्पण करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या या बस सेवेने गेल्या वर्षभरात परिसरातील प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि समाधानकारक सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांनी जवखेडा गाव व परिसरातील नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने बस सेवेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून बसचे वाहक एम. एस. राठोड आणि चालक एन. एस. घायवट यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी गावचे सरपंच लक्ष्मणराव ठोंबरे यांच्यासह भगवानराव ठोंबरे,बबनराव ठोंबरे, शेषराव ठोंबरे, रामदास ठोंबरे, जनार्दन घोडे, अण्णा ठोंबरे, राजू ठोंबरे,योगेश ठोंबरे, सोनाजी ढवळे, रामराव ठोंबरे, नागरे, रावसाहेब डकले, गजानन ठोंबरे,संतोष ढवळे,शिवाजी ठोंबरे, अतुल ठोंबरे तसेच इतर ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी परिवहन महामंडळाच्या या जनहितकारी उपक्रमाचे कौतुक करत, ‘ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी ठरलेल्या या बस सेवेने भविष्यातही अशीच नियमित, सुरक्षित आणि समाधानकारक सेवा देत राहावी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. गावकर्‍यांनी या सेवेबद्दल परिवहन महामंडळाचे मनःपूर्वक आभारही मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे