पेण येथे रंगला सामाजिक आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1
पेण येथे दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘आभासात मी’ या उरणचे सुपुत्र असलेल्या प्रा.एल. बी. पाटील लिखित पुस्तकासह ‘रामदास : अखेरचा प्रवास’ या गुंजार पाटील लिखित पुस्तकाचे प्रकाशन समारंभ दि. ३१ मे २०२६ रोजी आसरा फार्म, मु. वरवणे धनगरवाडी, पेण येथे संपन्न झाला .गुंजार पाटील यांचे १५ वे आणि एल. बी. पाटील(उरण )यांचे ३५ वे अशा दोघांच्या ५० व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले . ही वाचक साहित्यप्रेमींना जणू पर्वणीच होती.या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांचीआणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रशांत देशमुख यांनी भूषविले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय गुंजाळ-अध्यक्ष कोमसाप रायगड,कोकण गोवा महामार्गाचे गाढे अभ्यासक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील, रायगड कोमसाप कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मुळे- कोमसाप रायगड सचिव संजय होळकर , अंड गोपाळराव शेळके, महिलाध्यक्ष रायगड संध्या दीवकर,युवाध्यक्ष सिध्देश लखमदे ,गझलकारा ज्योत्स्ना राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय गुंजाळ यांच्या हस्ते झाले .तीन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी ए.डी.पाटील,चैतन्य उषा लक्ष्मण, आणि डॉ.राजेंद्र राठोड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी रामदास बोट अपघातग्रस्त सुपुत्र श्रीरंग घरत,ज्येष्ठ साहित्यिक रोहिदास पोटे,डॉ. राजेंद्र राठोड- साहित्यिक दीपाली दिवेकर-अस्सी. कमिशनर, नवी मुंबई यांची भाषणे झाली रायगडमधील गुणी जनांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये जीविता पाटील-ज्येष्ठ साहित्यिका, ज्येष्ठ कवी प्रवीण बोपुलकर, कवी डॉ.अमृत पाटील,कादंबरीकार गंज आनन म्हात्रे, कथाकार अजय शिवकर, साहित्य संपदाचे वैभव धनावडे , कवी गायक अनील भोईर,लवेंद्र मोकल इत्यादीचा सन्मानाने गौरव करण्यात आला. लेखक आगरी साहित्य रत्न प्रा.एल.बी.मर,लेखक गुंजारव पाटील यांचे शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.अतिशय विनोदी ढंगात गंधार पाटील पाटील यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सुप्रसिद्ध संचालिका दर्शना माळी आणि हेमंत बारटक्के यांनी करून दर्जेदार केला..




