राष्ट्रीय जंतनाशक मोहिम यशस्वीरित्या संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.28
जिल्हयामध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिम 27 ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कृष्ण कांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. राष्ट्रीय जंतनाशक मोहिम अंतर्गत जालना जिल्हयातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण मुले 2
लक्ष 11 हजार 647 व एकूण मुली 1 लक्ष 97 हजार 673 असे एकूण 4 लक्ष 9 हजार 320 अर्थात 93 टक्के मुला-मुलींना जंतनाशक गोळीची मात्रा देण्यात आली. काही कारणामुळे जंतनाशक गोळी न घेतलेल्यां 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींना दि.3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप अप राऊॅंड मध्ये देण्यांत येणारं आहे. 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्वांनी जंतनाशक गोळया घ्यावेत असे आवाहन डॉ.जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.
या अनुषगांने जिल्हा परिषद प्रशाला, शेलगांव ता.बदनापुर जिल्हा जालना येथे जिल्हास्तरीय उद्घाटन डॉ.जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी डॉ.जी.डी. म्हस्के सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.श्रीकांत देसाई माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. जगदीश बनसोडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हयामध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिम यशस्वी होण्यासाठी एकुण 4084 मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. अंगणवाडी, शाळामध्ये जंतनाशक गोळया प्रत्यक्ष खाऊ घालण्यांत आल्या. कोठे कोणतीही वाईट घटना घडली नाही. निरोगी बालक सदृढ भारत.



