pub-7425537887339079
ब्रेकिंग

“अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा”

खोपटे-कोप्रोली काँक्रेट रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थ मंडळ खोपटे यांची मागणी

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो. रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कारवान गोडाऊन जवळ,धसाखोशी /द.पी. पाडा बस स्टॅन्ड, म्हात्रेपाडा बस स्टॅन्ड,आणि विरगो बस स्टॅन्ड. या ठिकाणी तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार कल्पेश ठाकूर (गुरुजी) उपस्थित होते. “रस्त्यांचा विकास स्वागतार्ह आहे; मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे