pub-7425537887339079
ब्रेकिंग

फायनान्स कंपन्यांनी हफ्ते तगादा थांबवावा

0 5 0 6 1 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील गावात, दुष्काळाचे सावट पसरलेले दिसत आहे. अशातच अनेक गावातील छोटे शेतकरी शेतमजूर व हातावरील मजुरी करणारी मंडळी महिला तसेच पुरुष यांनी काही खाजगी संस्था, बचत गट, फायनान्स कंपन्या, यांच्याकडून विविध कारणांसाठीकर्ज उचललेले आहेत, कर्जाचा नियमित भरणा करत असतानाच मध्येच कमी पाऊस व नापिकीमुळे, तसेच मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे, लोक हतबल झालेले आहेत, पुरेसा पाऊस नसल्याने शेतातील सर्व पिकांचे नुकसान झालेले आहेत, खते,औषधे,फवारण्या व मजुरी, यावर झालेला खर्च पूर्णपणे वाया गेलेला आहे. शेतकरी तसेच मजूर हवालदिल झालेले आहेत, मजुरांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. अशातच ज्यांनी खाजगी संस्था बचत गट फायनान्स कंपन्यांकडून विविध कारणांसाठी, जे मागे कर्ज उचलेले होते त्यांचे राहिलेले हप्ते भरणे कठीण झालेले आहे. मात्र काही संस्थांचे कर्मचारी अधिकारी हे गावात येऊन सक्तीची वसुली करीत आहेत ज्यांनी हप्ते उचलले आहेत त्यांना वेळोवेळी फोन करून हप्ते भरण्याचा तगादा लावत आहेत. कर्मचाऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन काही काळ हप्ते वसुली थांबवावी, तसेच आरबीआय व संबंधित बँकांनी या संस्थांना अधिकृत पत्र देऊन सक्तीची वसुली थांबवावी अशी विनंती जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील गावातील लोक करीत आहेत. सक्तीची वसुली न थांबल्यास नाईलाजास्तव सर्व स्तरातील कर्ज धारकांना घेऊन, तहसील कार्यालय जाफराबाद येथे संविधानिक पद्धतीने मोर्चा काढावा लागेल असा इशारा एस.नाझीम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 6 1 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे