pub-7425537887339079
ब्रेकिंग

मनसे तर्फे विद्यार्थ्यांना छत्री व खाऊ वाटप.

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आज बेलपाडा गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गव्हाण विभाग सचिव ( समाजसेवक ) प्रदीप महादेव ठाकुर यांच्या पुढाकाराने बेलपाडा गावातील विद्यार्थ्यांसाठी छत्री व खाऊ वाटत करण्यात आले. त्या वेळी पनवेल तालुका सचिव निर्दोष केशव गोंधळी, उलवे शहर माजी अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील,उलवे शहर अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख, गव्हाण विभाग उपाध्यक्ष बाळकृष्ण ( बबलु) जगन्नाथ पाटील, संदिप म्हात्रे, अजित ठाकूर, गजानन म्हात्रे आदि विभागातील बरेच पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.छत्री व खाऊ वाटप केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सदर उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे