pub-7425537887339079
ब्रेकिंग

तोगरे दांपत्य तर्फे औषधे दान. समाजापुढे उभा केला नवा आदर्श.

0 5 4 0 1 0
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 18
परकियांच्या गुलामीत जन्मलेल्या भारतवाशियांना सावध करणारे पहिले स्वातंत्र्याचे उद्गगाते, सशस्त्र क्रांतीचे जनक, सत्यशोधक चळवळीचे संरक्षक, देशहित चिंतक, तन-मन’-धनाने राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे, जन जागृतीची ज्योत पेटविणारे, आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची २३२ वी जयंती निमित प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा, ता.अलिबाग, जि. रायगड येथे महाराष्ट्र प्रख्यात महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज सेवक उरणचे दांपत्य  संग्राम तोगरे व  सुमनताई संग्राम तोगरे यांनी ३०३ प्रकारची  रू. १, ३५, ०००/-  ( एक लाख पस्तीस हजार ) रूपये किंमतीची औषधे दान करून भारताचे आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन केले. या प्रसंगी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशिष जयवंत धरणकर, डाॅ. अमित मुरलीधर पठारे, कर्मचारी राजेंद्र रूईकर, राम तुळशिराम म्हात्रे,ऐश्वर्या आगावकर,मनाली दिवकर तसेच उरणचे सुरेश भोईर, श्री.देशमुख, ऋशीकेष देशमुख उपस्थित होते.
     जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज पर्यंत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातील १७३ सरकारी रूग्णालयात व काही नोंदणीकृत सामाजिक संस्थाना डाॅक्टरने प्रमाणित केल्या प्रमाणे रूपये
२, ०५, २३,३००/-(दोन कोटी, पाच लाख तेवीस हजार तीनशे) रूपयांची औषधे दान केली. ५ जिल्ह्यातील काही वाडे- पाड्यावर नवे-जुणे सर्व प्रकारची कपडे तसेंच ३ जिल्ह्यातील काही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दान केलेले आहे.तोगरे दांपत्याच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे