टेंभुर्णी शहरातील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना रखडली
जाफराबाद/ दत्ता देशमुख,दि.27
टेंभुर्णी ता जाफ्राबाद येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त ठेवणारे जलजीवन मिशन योजनेच्या दोषी अधिकारी कर्मचारी संबधीत गुत्तेदार यांच्या शासनाने तातडीने कार्यवाही करुन चौकशी करण्यात यावी आठ दिवसांत टेंभर्णीकरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर टेंभुर्णी येथील शिवाजी चौकात रस्ता रोको जन आदोंलन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पाणी बाणी इंशारा दिला आहे..
जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील पंचवीस हजार लोकवस्ती गावासाठी भारत सरकार राज्य सरकारने जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजना खडकपुर्णा धरणाच्या शेजारच्या काळेगाव येथून सुरू केली परंतु सदरील ठिकाणी अद्यापही स्वतंत्र विहीर नाही अशी चर्चा सुरू आहे तर चर खोदून घेतलेल्या पाणी पुरवठा योजना ठिकाणी वीज पुरवठा कमी दाबाच्या रोहीत्र बसविण्यात आले यामुळे मंजुरी दोनशे डीपी मंजूर असताना शंभर च्या डीपवर कसे काम भागविण्यासाठी थातुरमातुर योजना राबविण्यात येत आहे यामुळे पाणी पुरवठा सुरळीत नाही.. संबंधित गुत्तेदार यांनी याकामाबाबत दिरंगाई केली आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून टेंभर्णीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती थाबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे..
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावची 25-हजार लोकसंख्येसाठी पाण्याचा तुटवडा:*
टेंभुर्णी शहर व परिसरातील अंदाजे 25 हजार लोकसंख्येला गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेला कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही काम अर्धवटच आहे. गावातील अंतर्गत पाइपलाइनचे काम अद्याप पूर्ण झाल्यामुळे जलपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. नागरिकांना आजही खाजगी शेकडो रुपये मोजावे लागतात टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असून, टँकरही दिवसाआड येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
*2) कोट्यवधींचा निधी, मात्र प्रत्यक्षात अर्धे काम – ठेकेदारांची दिरंगाई:*
सन 2023 पासून या योजनेचे उद्घाटन तीन ते चार वेळा करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदार राठोड यांच्या दिरंगाईमुळे कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला असून तो सतत बंद पडत आहे. खडकपूर्णा नदी फीडरवर वारंवार भारनियमन होत असल्याने पंपिंग स्टेशन सुरूच होत नाही. याबाबत विचारले असता ठेकेदार पांडे यांनी “वीजेचे काम माझे नाही” असे स्पष्ट करत जबाबदारी झटकली आहे. योजनेचे विद्युत काम प्रलंबित असून अधिकारी मात्र गप्प बसले आहेत.
*3) अधिकाऱ्यांचे मौन, ग्रामस्थ आक्रमक – रस्ता रोकोचा इशारा:*
टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा कालावधी जानेवारी 2026 मध्ये संपला असून त्यानंतर कोणताही पाठपुरावा झालेला नाही. ग्रामस्थाचा आरोप आहे की अधिकारी “मुग गिळून गप्प” आहेत. नागरिकांनी आता तीव्र नाराजी व्यक्त करत टेंभुर्णी चौकात रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. “आठ दिवसांत पाणी सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करू” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
*झेडपी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी:*
गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोटः टेंभर्णीकरांना राजकीय नेत्यांनी उलू बनवून सत्ता स्थापन करण्यात आली पुन्हा पुन्हा खडकपुर्णा धरणाच्या पाणी प्रश्न मुद्दा घेऊन दोन वेळा ग्रामपंचायत लढली शेकडो वेळा नारळ फोडले डीजीटल बँनर उदघाटन भुमीपुजन केले यामुळे टेंभर्णीकरांच्या डोळ्यात दिवसा अंजन घालण्याचे काम स्थानिक तुघलकी पुढारी आणि त्यांच्या नेत्यांनी केले आहे… शुमभ मुळे सामाजिक सघटना मंडळ टेंभुर्णी पदधिकारी…
कोटः संबंधित या योजनेचा चुकता बोभाटा झाला गाव अंतर्गत नळयोजनेच्या पाईपलाईन टाकणे जोडणी बाकी असताना दिरंगाई होते आणि कामचुकार अधिकारी गुत्तेदार यांच्या वर रित्या सर कार्यवाही करावी अशी मागणी रावसाहेब अंभोरे चेअरमन



