माहोरा येथे रेणूका माता कृपेने अखंड हरिनाम सप्ताह संत चरित्र व ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28
गुरुवार या दिवशी पासून जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे अखंड हरिनाम सप्ताह संत चरित्र व ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात झालेली आहे.
रोज सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ८ विष्णू सहस्त्रनाम,१० ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ४ संत चरित्र, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ८.३० ते १०.३० हरी कीर्तन अशा प्रकारे दररोजचे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे श्री रेणूका माता देवस्थान समितीचे आवाहन केले आहे.
तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की प्रतिवर्षीप्रमाणे यांच्या आशीर्वादाने धर्म जागृती समाज प्रबोधन व अविराच्या मार्गाने जाणाऱ्या समाजाने विचारांच्या मार्गावर येण्याकरिता थोरांच्या विचारांची गरज आहे. याकरिता हा दररोज रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत हरी कीर्तन व पवित्र घेऊन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती अशी रेणुका माता देवस्थान च्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच कार्यक्रमाची सांगता ०२/०४/२०२६ चैत्र कृ.१ रोज गुरुवार या दिवशी होणार आहे आणि त्याच दिवशी महाप्रसाद सुध्दा आहे. यादिवशी जास्तीत जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका माता देवस्थान व समस्त गावकरी मंडळी माहोरा यांनी केले आहे.

