pub-7425537887339079
ब्रेकिंग

इस्कॉनतर्फे रथयात्रा • टाळ-मृदंगाचा गजर, श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय

'हरे कृष्ण'च्या जयघोषाने टेंभुर्णी दुमदुमले

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

हरे कृष्ण, हरे कृष्ण या महामंत्राच्या जयघोषाने श्रीकृष्ण नामस्मरणाने टेंभुर्णी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गावातून श्रीकृष्णाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्या वतीने जपा सेशन, मंगल आरती, नगर संकीर्तन, श्रीकृष्ण अभिषेक, प्रवचन, महाआरती तसेच महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी संत सावता मंगल कार्यालय येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगणारे प्रवचन झाले. इस्कॉनचे रास गोविंद प्रभू

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व विशद केले. भगवान श्रीकृष्ण सर्वव्यापी देवता आहेत. प्रत्येकाने श्रीकृष्णाच्या भक्तीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत. भगवंताने आपल्या इच्छेनुसार देवकीच्या पोटी अवतार घेतला. श्रीकृष्णाच्या जन्मावेळी देवकी माता अत्यंत प्रज्वलित झाल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होत असताना सर्व देवी-देवता प्रार्थनेसाठी उपस्थित झाले होते. भगवान श्रीकृष्ण हे पुरुषांमध्ये

उत्तम पुरुष आहेत. म्हणून त्यांना ‘पुरुषोत्तम’ असेही म्हटले जाते. अशा भगवंताची भक्ती व सेवा केल्याने जीवन यशस्वी व सार्थक करण्यास मदत होते, असेही रास गोविंद प्रभू यांनी प्रवचनातून स्पष्ट केले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रेला टेंभुर्णीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रथयात्रेदरम्यान भाविकांनी श्रीकृष्णाचा जयजयकार करीत हरिनामाचा गजर केला. याप्रसंगी शालिकराव म्हस्के,

भगवान श्रीकृष्णाला ५६ विविध पदार्थांचा नैवेद्य

– श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाला ५६ विविध पदार्थांचा नैवेद्य, अर्थात ‘५६ भोग’ अर्पण करण्यात आला. भाविकांनी श्रद्धेने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणले. या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला. यानंतर दूध, मध यासह विविध पवित्र पदार्थांनी भगवान श्रीकृष्णाचा विधिवत अभिषेक करण्यात आला. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्ती, श्रद्धा, हरि नामाच्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने टेंभुर्णी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

इस्कॉनचे देवपती प्रभू, लता खांडेभराड, विठ्ठल रांधवन, भारत जोशी, विजय जाधव, ऋतिका खांडेभराड, कैलास सोनसाळे, भरत जोशी, शंकर खरात यांच्यासह इस्कॉनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे