pub-7425537887339079
ब्रेकिंग

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे Combined Defence Service (CDS) परीक्षा पूर्व प्रशिक्षण कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग दि. 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. 4 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal (Resources Nashik-CDS-67) मधून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातूनही प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून त्यांनी लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व व्हॉट्सअॅप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे