pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या समीर पठाणचे ज्यूदो स्पर्धेत दैदीप्यमान यश!

७३ किलो वजन गटात रौप्य पदकाची कमाई; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

0 5 3 8 4 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 16

जाफराबाद छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील दगडूजीराव देशमुख महाविद्यालयात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन ज्यूदो स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या समीर पठाण याने उल्लेखनीय कामगिरी करत ७३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेदरम्यान समीर पठाण याने उत्कृष्ट खेळ, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत दिली. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशाने महाविद्यालयासह परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के, संस्थेचे सचिव मा. डॉ. राहुलजी म्हस्के, महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. सविता सिनगारे, उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे तसेच महाविद्यालयाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा. अनिल वैद्य यांनी समीरचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूला स्पर्धेच्या तयारीदरम्यान प्रा. उदय वझरकर, प्रा. वाहेद पटेल आणि प्रा. शिवाजी वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे समीरला आपल्या खेळात अधिक प्रावीण्य मिळविण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. समीर पठाण याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 4 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे