pub-7425537887339079
ब्रेकिंग

निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

0 5 4 8 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 27

जालना व बदनापूर तालुक्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारक, स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या वारसांनी निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत हयातीचे प्रमाणपत्र (Life Certificate) तहसील कार्यालय, जालना येथे सादर करावे, असे आवाहन तहसीलदार आर. एम. निहाळ यांनी केले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन देण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे जालना व बदनापूर तालुक्यातील सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर करावे.

हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालय, जालना येथील हॉल क्रमांक 11 येथे व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमाणपत्राची मूळ प्रत आणि मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या पेन्शन खात्याच्या बँक व्यवस्थापकाची स्वाक्षरी असलेले हयातीचे प्रमाणपत्र किंवा ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करावे.

31 डिसेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रमाणपत्र सादर करून निवृत्तीवेतन वितरणातील संभाव्य विलंब टाळावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 8 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे