pub-7425537887339079
ब्रेकिंग

अ.भा. लोकहित महासंघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी बशीर खान यांची नियुक्ती

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनीधी,दि.7

अखिल भारतीय लोकहित महासंघाची मासीक बैठक नुकतीच महासंघाचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री बलराज कॉर्नर, मिया साब दर्गा रोड जालना येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी जालना जिल्हयातील तसेच ईतर अनेक सामाजीक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाचे वरिष्ठ व सक्रीय कार्यकर्ते बशीर खान मुनीर खान रा. चौधरी नगर, जालना यांची जालना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महासंघाच्या माध्यमातुन आपल्या परीसरातील तसेच समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आदेश महासंघाचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांनी बशीर खान यांना दिले आहेत, तर बशीर खान यांनीही महासंघाच्या माध्यमातुन सर्व जाती धर्मातील, सर्व स्तरातील नागरीक, महिला, विद्यार्थी, कामगार यांच्या प्रश्नांसाठी तन मन धनाने लढणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी महासंघाचे अजिम खान, प्रदिप दिव्यवीर, मो. मारूफ खान, महिला प्रतिनीधी श्रीमती शेख मेहजबीन, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड यांची उपस्थिती होती. बशीर यान यांच्या निवडीचे सर्व सभासदांनी तसेच त्यांच्या मित्र परीवाराने अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे