“विनोद म्हात्रे हा धडाडीचा कार्यकर्ता आहे, त्याचा जनसंपर्कात हातखंडा आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात तो एकदा जिल्हा परिषद सदस्य झाला. मात्र पुन्हा संधी असूनही तो दोन पावले मागे आला. एका वकिली पेशातल्या तरुणाला संधी दिली आणि निवडूनही आणला. हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. आज तो व्यवसायातही भरारी घेतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. उरण परिसरात त्याला उत्तमोत्तम संधी आहेत, त्याने आता जोमाने कामाला लागावे, युवकांना संधी देण्याची माझी भूमिका आहे. राजकारणात त्याला योग्यवेळी संधी आणि साथही दिली जाईल. उरणची मदार आता त्याच्यावर आहे. त्यामुळे आज त्याने जनसंपर्क कार्यालय सुरू करून आणखी पुढचे पाऊल टाकले आहे. खोपटे येथील त्याच्या जनसंपर्क कार्यालयातून अडले नडलेल्याला न्याय मिळेल, अशी मला आशा आहे. मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत खोपटे येथे म्हणाले. शुक्रवारी (ता.७) विनोद म्हात्रे यांच्या जनसंपर्क आणि जेजुरी एंटरप्राईजच्या कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील, केशव घरत, चंद्रशेखर ठाकूर, किरीट पाटील, वैभव पाटील आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.