pub-7425537887339079
ब्रेकिंग

दुचाकी वाहनांसाठी 22 जुलै पासून नव्या क्रमांकाची मालिका

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.21

नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल नोंदणी मालिका एमएच 21 सी एल-सद्यस्थितीत सुरु असून सदर मालिकेतील क्रमांकाचे वाटप पुर्ण होत आहे. त्या अनुषंगाने नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल वाहनांसाठी एमएच- 21 सी पी 0001 ते 9999 (MH-21 CP- ०००१ to ९९९९) हि मालिका दिनांक 22 जुलै, 2026 पासून सुरु करण्यात येणार आहे. ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांनी आपल्या विहीत नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा मुळ किमतीचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना (DY. R.T.O. JALNA) यांचे नांवे धनाकर्ष, ओळखपत्राच्या (आधारकार्ड) छायांकित प्रतिसह (स्वयंसाक्षांकीत), पॅनकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांकासह दिनांक 22 जुलै, 2026 रोजी दुपारी 2:00 वाजेपर्यंत कार्यालयात अर्ज जमा करावा. सदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व मा. परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी अनेक अर्जदारांनी अर्ज केल्यास त्यासाठी विहीत पध्दतीने लिलावाची प्रक्रिया अवलंबिण्यात येईल. एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त आलेल्या अर्जदारांनी वाढीव रकमेचा एक धनाकर्ष आणणे आवश्यक आहे. पहिला धनाकर्ष मुळ किंमतीचा व दुसरा धनाकर्ष आपण लावलेल्या बोलीच्या वाढीच्या रकमेचा असावा. सदरील धनाकर्ष विहीत शुल्कापेक्षा सर्वात जास्त रकमेचे ज्यांचे असतील त्यांनाच सदर क्रमांक आरक्षित करुन दिला जाईल. सर्व संबंधीतांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना (DY.R.T.O. JALNA) यांचे नावावर आपले धनाकर्ष बंद लिफाफ्यात दिनांक 23 जुलै, 2026 रोजी दुपारी 1:00 वाजेपर्यंत सादर करावे. सदर वेळेनंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष जमा करुन घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच दुपारी 3:00 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील. त्यावेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मनिष दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे