खरिपाच्या कामांना वेग: निंभार्णी परिसरात पेरणी करिता शेतकऱ्यांची लगबग , जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र अद्याप कायम

मोर्शी/प्रतिनिधि,दि.28
परिसरात कपाशी, तूर, सोयाबीन असून तिच्या लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. निंभार्णी परिसरात पावसाचे आगमन झाले. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सध्या शेतकरी पेरणीकडे असल्याने मोमजूर वर्गही कामाला लागला आहे.तालुक्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी मे महिन्यात मिरचीची लागवड केली आहे. साधारण हे पीक एक महिन्याचे देखील झाले आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या मिरचीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असल्याने पीक चांगल्या स्थितीत आहे. मात्र पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत होता. जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता. पण शुक्रवारी (दि.२६) भागात पाऊसाने जोरदार हजेरी लावली निंभार्णी, राजुरवाडी, तुळजापूर, कमळापूर, कवठाळ, भांबोरा, परिसरात पेरणी करण्यासारखा पाऊस झाला आहे. शेतांच्या चाऱ्यांमध्ये पाणी साचले होते. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करण्या साठी शेतकऱ्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात बी बियाणे खरेदी करून ठेवली होती . शेतात पेरणी करण्यासाठी बेड तयार केले असून केवळ पावसाची प्रतीक्षा होती. अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी आता कपाशी तूर सोयाबीन पेरणी करायला लागला आहे. परप्रांतातील कापूस खरेदी करण्यासाठी येतात. चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे,शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध पहिल्या पावसानंतर शेतमजुरांना पेरणी करण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. शेतात बेड तयार करणे, आच्छादनासाठी प्लास्टिक कागद पसरवणे, ठिबक सिंचनाच्या नळ्या लावणे अशी असंख्य कामे असल्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकरी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.




