pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीत महेंद्रशेठ यांचे महत्त्वाचे योगदान : रामशेठ ठाकूर

महेंद्रशेठ घरत यांचे बॅडमिंटनसाठी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

“महेंद्रशेठ घरत हे गेली अनेक वर्षे कामगारांसाठी उत्तम काम करीत आहेत. आता तर जागतिक पातळीवर कामगारांच्या हक्कांसाठी लढतोय. त्याने उत्तम फिटनेस राखली आहे, तो साठीतही तरुणच असेल, एवढी त्याने व्यायामाने तब्बेत सांभाळली आहे. त्याला खेळाची आणि खेळण्याचीही आवड आहे. त्यामुळे खेळाडूंना तो नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. त्याने अनेक चांगले गुण आत्मसात केलेत. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्याचे भरीव योगदान आहे, याची मला जाण आहे,” असे माजी खासदार रामशेठ ठाकूर गुरुवारी (ता. १८) म्हणाले. योनेक्स-सनराईझ रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी १६ ते १८ जून रोजी घेण्यात आली. त्याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रामशेठ ठाकूर बोलत होते. बॅटमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडने याचे आयोजन केले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे प्रायोजक होते. त्यांनी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व स्विकारले होते. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे देशात अव्वल असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. त्यांनी आपले सासरे दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावे शिक्षण संस्था सुरू करून उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणाऱ्या शाळा सुरू केल्या आहेत. उच्च गुणवत्ता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, या कामात मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. १०० कोटींच्या घरात त्यांनी त्यासाठी खर्च केले आहेत, जेणेकरून खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील. आज देशभरातून उलवे नोडमध्ये नागरिक राहायला आलेत, त्यांना आणि त्यांच्या मुलांना या स्टेडियमचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे येथील खेळाडू येत्या काळात जागतिक पातळीवर चमकतील, असा मला ठाम विश्वास आहे. येथील बॅडमिंटन खेळाडूंना सहकार्य करीत आलो आहे, यापुढेही करणार आहे.” या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. १८४ खेळाडूंनी २५ गटांमध्ये २६३ प्रवेशिका पाठविल्या. स्पर्धा मुले व मुलींसाठी एकेरी आणि दुहेरी प्रकारात ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला गट अशा विविध वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, वाय. टी. देशमुख, साईकुमार जी., माताप्रसाद त्यागी हे विशेष उपस्थित होते. या प्रसंगी रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना सुमारे ३ लाखांची रोख बक्षिसे व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय, मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे