जाफराबादमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, शेतकरी व वाहनधारक चिंतेत आहे

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.23
जाफराबाद तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर कॅनमधून डिझेल देण्यास बंदी घालण्यात आल्याने गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीची कामे सुरू असतानाच डिझेल मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर शेती मशागतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच शेतकरी ट्रॅक्टर, दुचाकी तसेच कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल होत होते. मात्र, कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यामुळे पंप परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा रस्त्यावर आल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी 66 स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी “सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असून ट्रॅक्टर आणि पंपासाठी डिझेल अत्यंत गरजेचे आहे. मात्र पंपावर तासन्तास रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतीची कामे खोळंबतील.” – असंख्य शेतकरी कार्यालयातून २२ मे २०२६ रोजी काढण्यात आलेल्या पत्रानुसार, खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना अधिकृत बॅरल किंवा कॅनमधून डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना डिझेल देताना संबंधित ट्रॅक्टरचे आरसी बुक तसेच एग्रीस्टॅक आयडी (Farmer ID) तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची स्वतंत्र नोंद रजिस्टरमध्ये 66 नियमांचे पालन करून वितरण “प्रशासनाच्या आदेशानुसारच आम्ही डिझेल वितरण करत आहोत. कॅनमधून डिझेल देताना शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत असला तरी नियमांचे पालन करूनच डिझेल दिले जात आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.” – सर्व पेट्रोल पंप चालक ठेवावी लागणार आहे. एग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, नाव व स्वाक्षरी घेऊन नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोंदींची तपासणी तहसीलदारांच्या पथकांकडून केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सुविधेचा गैरवापर, काळाबाजार किंवा विक्री आढळल्यास साठेबाजी, अनधिकृत जिल्हाधिकाऱ्यांची नियमावली 1 खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना अधिकृत बॅरल किंवा कॅनमधून डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2 शेतकऱ्यांना डिझेल देताना ट्रॅक्टरचे आरसी बुक तसेच एग्रीस्टॅक आयडी तपासणे बंधनकारक असून नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी लागेल. 3 एग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, नाव व स्वाक्षरी घेऊन नोंद ठेवावी लागेल, ज्याची तपासणी तहसीलदार पथक करेल. सुविधेचा गैरवापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि पेसो नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे. . दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे डिझेलटंचाईमुळे अडथळा निर्माण झालेल्या शेती कामांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



