pub-7425537887339079
ब्रेकिंग

‘आदर्श शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात संपन्न

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था तसेच जिजामाता महिला विकास व शिक्षण संस्था, जाफराबाद यांच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ जिजाऊ शैक्षणिक संकुल, वरुड बु. येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ. सुरेखाताई संजयजी लहाने तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रविंद्र मगर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य श्री. कैलास टाले यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रविंद्र मगर यांनी शिक्षक कसा असावा, शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व मूल्यांची जोड देऊन त्यांना कसे घडवावे, तसेच बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना सक्षम व जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यात शिक्षकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना, आत्मविश्वास व मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त श्री. सुयश लहाने, तसेच श्री. रंगनाथ खेडकर, श्री. मोहनमाऊ मुळे, श्री. विलास आप्पा शिंदे, श्री. मनोहर देशमुख, श्री. राजाराम भेंडाळे, श्री. गणेश अण्णा परिहार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव श्री. संजयजी लहाने यांच्या पुढाकारातून जाफराबाद शहरासाठी ‘स्वर्ग रथ’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत १,००१ गरजू व निराधार नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असून, गरज असलेल्या लाभार्थ्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियाही चांगल्या व तज्ज्ञ दवाखान्यात करून देण्यात येणार आहेत.
शिक्षकांचा सन्मान करण्यासोबतच गरजू व निराधार नागरिकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवून संस्थेने शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक दिनानिमित्त आयोजित हा सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.विजय पवार यांच्या प्रस्ताविक करून झाली, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सचिन देशमाने यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे