pub-7425537887339079
ब्रेकिंग

जवाहर नवोदय विद्यालयात लॅटरल एन्ट्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन  

0 4 8 4 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

परतुर  जवाहर नवोदय विद्यालय लॅटरल एन्ट्री (वर्ग 9 वी व 11 वी ) दि. 10 एप्रिल, 2027 साठी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने भरले जात असुन जिल्हयातील इयत्ता आठवी व इयत्ता दहावी वर्गात सन 2026-27 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह सेवाकेंद्रावरून यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 अशी आहे.

इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घ्यावी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फोटो, स्वाक्ष-या हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून वर्ग नववी साठी “https://cbseitms.nic.in/2026/nvsix 9″ या संकेतस्थळवरून व अकरावी साठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi 11 संकेतस्थळवरून भरावेत.

जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  अर्ज भराण्याचे  आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पदार यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे