जाफ्राबाद शहरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शिबीर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
जागतिक योग दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे शनिवारी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम शिस्तीत आणि उत्साहात संपन्न झाला. शिबिराच्या सुरुवातीला सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणा यासह विविध आसने नागरिकांनी एकत्रितपणे केली. यावेळी मार्गदर्शकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले योगाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. या शिबिराला शहरातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाफ्राबाद बाजार समितीचे सभापती गोविंदराव पंडित, डॉ. रमेश मोठे आणि साहेबराव मोरे यांच्यासह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने संपूर्ण मैदान योगमय झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि योग संस्थेच्या कार्यकत्यांनी विशेष ============== चौकट :- करा योग, रहा निरोगी “आजच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव वाढला आहे. नियमित योगाभ्यासामुळे केवळ शरीरच नाही तर मनही निरोगी राहते. ‘करा योग, रहा निरोगी’ हा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने दररोज किमान तीस मिनिटे योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा.” – रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय मंत्री —– मेहनत घेतली. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि दररोज सकाळी योगाभ्यासाची सवय लावण्याचे आवाहन केले.



