लग्न समारंभात, बहुले व भारतीय संस्कृती लुप्त, डीजेचा धम धूम — रामराव महाराज पाचे

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28
लग्नसराई मध्ये बहुल याला विशेष महत्त्व हजारो वर्षापासून असलेली लग्नामध्ये बहुले तयार करण्याची परंपरा रामराव महाराज पाचे यांनी असे सांगितले की हे बहुले मुलीचे मामा तयार करतात संपूर्ण विवाह सोहळ्याचे मंडपाचा संरक्षण हे बहुले करत असते बहुल्यासमोर कन्यादान होम हवन आधी विधी केले जातात बहुल्याचे असे महत्त्व आहे की तीन प्रस्थ असतात वानप्रस्थ ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम गृहस्थाश्रमामध्ये नवदांपत्यांना अखंड वंश वृद्धी ठेवत राहावी यासाठी बहुल्याजवळ कन्यादान करण्याची प्रथा आहे आणि संपूर्ण लग्न होईपर्यंत हे बहुले संपूर्ण लग्नाचे नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण करते. श्री कारभारी पाचे यांची कन्या प्रतीक्षा यांच्या विवाह सोहळ्यामध्ये तयार केलेले रामू गावंडे मुलीचे मामा मामांनी हे आकर्षक जीवत्व असलेले बहुले तयार केले यावेळी सर्व आप्तविष्ट यांनी बहुल्याचे पूजन करून शुभ कार्यनिर्विघ्नपणे पार पडावं नवदांपत्यांचं जीवन सुखी समाधानी निरामय व्हावं अशी प्रार्थना केली एरवी लॉन्स मध्ये कार्यालयामध्ये बहुल्याची प्रथा लोक पावत चालली आहे याकडे नवीन पिढीने बहुल्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे असे श्री पुरोहित विठ्ठल महाराज शेंबेकर यांनी सांगितले




