pub-7425537887339079
ब्रेकिंग

मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालयात  सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात

छात्राध्यापकांच्या कलाविष्कारांनी जिंकली उपस्थितांची मने; शिवस्तुतीपर पोतराज गीत ठरले विशेष आकर्षण

0 5 4 4 6 2
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.24
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालयात बी.एड. द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी आयोजित केलेले सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध प्रांतांच्या वेशभूषा, गीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांतून छात्राध्यापकांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वडजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मंगेश ढोबळे उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. जयनारायण रेगुडे, प्रा. डॉ. कावेरी डहाळे, प्रा. गुजर आणि प्रा. जोशी यांची उपस्थिती होती. कवयित्री छात्राध्यापिका शीतल भोईटे यांनी प्रभावी शैलीत सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. जयनारायण रेगुडे आणि छात्राध्यापिका श्रीदेवी सूर्यवंशी यांनी सादर केलेले शिवस्तुतीपर पोतराज गीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. मंगेश ढोबळे यांनी सांस्कृतिक उपक्रमांमुळे भावी शिक्षकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता व संघभावना विकसित होते, असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वडजे यांनी छात्राध्यापकांच्या नियोजनाचे व कलागुणांचे कौतुक केले. कला, संस्कृती आणि मैत्रीचा संगम घडविणारे हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 4 6 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे