pub-7425537887339079
ब्रेकिंग

ॲग्रोव्हिजनने राबवला पुण्यस्मरण स्तुत्य उपक्रम नळविहिरा येथील मोफत नेत्र शिबिराला मोठा प्रतिसाद

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5

नळविहिरा ता जाफराबाद येथे सोमवार दि. ०४ मे २०२६ रोजी सत्कर्मी स्व. दमोतराव दौलतराव पाटील मोरे ( मा. पोलीस पाटील ) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्रक्रिया शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. लॉयन्स नेत्र रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून ॲग्रोव्हिजन गटशेती संघ आणि नल ॲग्रोव्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांनी हे नेत्र तपासणी शिबीर घडवून आणले. जगप्रसिद्ध व पुरातन “जय तिर्थेश्वर गणेश मंदिर, श्री नळदमयंती संस्थान” या ठिकाणी पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील अनेक गरजवंत रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक संगणकीय यंत्रणेद्वारे शंभरावर अधिक रुग्णांच्या डोळ्यांची यावेळी तपासणी करण्यात आली. ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना नाममात्र दरात जागेवरच चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. तसेच मोतीबिंदू आढळलेल्या पंधरा रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांची लॉयन्स नेत्र रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मोफत ने-आण, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. लायन्स नेत्र विभागाचे श्री. योगेश निकाळजे, श्री. पवन रणपिसे, श्री. संतोष मंजुळे या तज्ञ् मंडळींनी रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शनही दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा विनामूल्य मिळाली असून, स्व. दमोतराव पाटील मोरे यांच्या समाजसेवेच्या विचारांना योग्य आदरांजली अर्पण करण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील व परिवारासह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे