pub-7425537887339079
ब्रेकिंग

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याने जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाचा उत्साहात समारोप

0 4 6 2 7 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.16

जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा समारोप दि. 15 जुलै, 2026 रोजी बॅडमिंटन हॉल, पोलीस परेड ग्राउंड, जालना येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलिस अधीक्षक, तेघबीरसिंह संधू यांचे मार्गदर्शनाखाली “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” उत्साहात संपन्न झाला. जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाची सुरुवात दि. 7 जुलै, 2026 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनाने झाली होती. संपूर्ण सप्ताहामध्ये रांगोळी स्पर्धा, मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण, उद्योजकांचा सन्मान, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचा सन्मान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत निवड झालेल्या युवक-युवतींना नियुक्तीपत्रांचे वितरण, नव उद्योजकांचा सन्मान, तसेच जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपआयुक्त, विद्या शितोळे, कौशल्य विकास, छत्रपती संभाजीनगर या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक होते. यावेळी प्रमुख अतिथी सहायक आयुक्त, गणेश चिमणकर, कौशल्य विकास, जालना विभागस्तरीय रोजगार मेळावा समन्वय समिती सदस्य अविनाश यशवंत देशपांडे, जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष, अनिल तलरेजा व समिती सदस्य, पंकज कासलीवाल, प्रगणेश केनिया, संजय मिसाळ, मनोहर खाकरे, राजेश भुतिया तसेच, पोलीस निरीक्षक, पंकज उदावंत, राखीव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक, विलास पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध उद्योग, कंपन्या, बँका व संस्थांच्या मुलाखत स्टॉलना भेट देऊन उमेदवारांशी संवाद साधला. त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. तसेच जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहादरम्यान आयोजित रांगोळी, निबंध, वक्तृत्व व इतर स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करून त्यांना सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. “कौशल्य हीच यशाची खरी ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करा, प्रत्येक संधीचे सोने करा आणि रोजगारासोबत उद्योजकतेच्याही दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करा. सक्षम, कौशल्यसंपन्न आणि स्वावलंबी युवा हीच विकसित भारताची खरी ताकद आहे.” यावेळी त्यांनी युवकांना संदेश दिला. रोजगार मेळाव्यामध्ये विविध शासकीय आस्थापना, उद्योग, कंपन्या, बँका तसेच इन्शुरन्स व फायनान्शिअल संस्थांनी सहभाग नोंदविला. मेळाव्यास 797 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 765 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तर 234 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले, तर डॉ. अमोल परिहार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अधिकारी व कर्मचारी अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रवींद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे, गणेश सुपारकर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील संजय सोनवणे व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 7 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे