pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिक्षक हा समाज परिवर्तनाचा आरसा : प्राचार्य म्हस्के

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा अटक नसून सामाजिक जडणघडणीतील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन, नवनिर्मिती आणि प्रगतिशील वेचारांची रुजवण करण्याचे नहत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात. त्यामुळे शिक्षक हा समाज परिवर्तनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन श्री रंगनाथ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य यू. आर. म्हस्के यांनी केले.

जालना तालुक्यातील वाघ्घुळ येथील श्री रंगनाथ महाराज महाविद्यालयात शक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ने अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास पर्यवेक्षक एम. एस. कोरडे, ना. एस. डी. लेंडीकर, प्रा.एन. एस. मोरे, ना. राऊत आदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर नकाश टाकला. प्रा. एन. एस. मोरे

रंगनाथ महाराज महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे जीवनकार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच आधुनिक समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य यू. आर. म्हस्के यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जाणीव देण्याचे कार्य शिक्षक करतात. शिक्षकांच्या प्रयत्नातूनच सक्षम नागरिक आणि प्रगतिशील

समाजाची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात समाजाप्रति असलेली जबाबदारी पार पाडताना विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. के. एस. चव्हाण, आभार वसंत उगले यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे