pub-7425537887339079
ब्रेकिंग

रस्त्याच्या दुतर्फा नसलेले पांढरे पट्टेआणि वळणावरील गतिरोधकच अपघाताला कारणीभूत

चुकीच्या गतिरोधक टाकल्याची प्रवासी, वाहन चालकांमध्ये चर्चा सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते वाहतूक परिवहन विभागाचे दुर्लक्ष

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5

जाफराबाद मावरा मार्गे भोकरदन कडे जाणारे, जाफराबाद टेंभुर्णी मार्गे जळगाव राजाकडे जाणारी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याचे काम चालू असतानाच टाकलेल्या गतिरोधकांच्या संदर्भात दिशादर्शक पांढरे पट्टे व सूचनाफलक नसल्यामुळे व चुकीच्या ठिकाणी गतिरोधक टाकल्यामुळे अपघाताला आमंत्रण असल्याचे प्रवासी आणि वाहनचालकामध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी असून ते तात्काळ बदलण्याची मागणी होत आहे. देऊळगाव राजा (बुलढाणा जिल्हा) आणि कन्नड (छत्रपती संभाजीनगर जिल्हा) यांना जोडणारा मार्ग क्रमांक १७८ प्रामुख्याने जाफ्राबाद मार्गे जातो. रस्त्यावरील खुणा हे रहदारीचे नियमन,सुरक्षितता आणि वाहनचालकांना दिशा देण्यासाठी रस्त्याच्या पृष्ठभागावर रंगवलेले पट्टे, बाण किंवा शब्द असतात, हे प्रामुख्याने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात असतात,जे लेनिंग,थांबणे,ओव्हरटेकिंग आणि पादचारी क्रॉसिंग सूचित करतात,महत्त्वाच्या रस्त्यावरील खुणा आणि त्यांचे अर्थ:तुटक पांढरी रेषा,लेन बदलण्याची किंवा सावधगिरीने ओव्हरटेक करण्याची परवानगी आहे,सलग पांढरी रेषा,लेन बदलण्यास मनाई आहे;आपल्या लेनमध्येच राहावे,दुहेरी सलग रेषा,ओव्हरटेकिंग सक्त मनाई आहे, विशेषतः वळणावर किंवा धोकादायक ठिकाणी पिवळी रेषा,विरुद्ध दिशेची वाहतूक वेगळी करण्यासाठी वापरली जाते,झेब्रा क्रॉसिंग,पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी बनवलेले पांढरे पट्टे,थांबा रेषा,सिग्नल किंवा जंक्शनवर वाहने कुठे थांबवावीत हे दर्शवणारी सलग रेषा.दिशा बाण,वाहनाने कोणत्या दिशेने जावे (थेट,वळण) हे दर्शवतात.या खुणा सुरक्षित प्रवासासाठी आणि अपघाता टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारतात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बनवण्याचे नियम इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) द्वारे ठरवले जातात.उंची १०-१२ सेमी, रुंदी ३.५ ते ३.७ मीटर,आणि वर्तुळाकार त्रिज्या १७ मीटर असावी, गतिरोधकावर काळ्या-पांढऱ्या पट्ट्या आणि ४० मीटर आधी सूचना फलक लावणे अनिवार्य आहे. हे नियम पाळणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.स्पीड ब्रेकरचे मुख्य नियम (IRC) स्पीड ब्रेकरचा आकार गोलाकार असावा,खूप टोकदार नसावा.उंची: १० ते १२ सेंटीमीटर.रुंदी: ३.५ ते ३.७ मीटर,रंग आणि दृश्यमानता :स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असावेत,जेणेकरून रात्रीच्या वेळी ते स्पष्ट दिसतील.थर्मोप्लास्टिक पेंट: पेंट पुसट झाल्यास पुन्हा रंगवणे गरजेचे आहे,सूचना फलक स्पीड ब्रेकरच्या ४० मीटर आधी सावधगिरीचा फलक असावा,वाहन चालकांना वेग कमी करण्याची सूचना देणारा फलक असावा. गतिरोधक हे ट्रॅफिक मॅनेजमेंट डिव्हाइसेस आहेत,जे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यावर उभारले जातात त्यामागील उद्देश वाहनांचा वेग कमी करणे आणि रस्ता अपघातांवर आळा घालणे,आणि दुसरा नियम यावर पांढरे पट्टे असावे लागतात,जेणेकरून ते लांबून दिसू शकतील,आणि रस्ता बाजूला कुठपर्यंत आहे ते समजू शकेल. मात्र संबंधितांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवून ठेवल्या मुळे बर्याच निष्पाप लोकांचा आपला जीव गमवावा लागला आहे,आणि बरेच वाटसरू ना अपंगत्व आले आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते वाहतूक परिवहन विभागाचे दुर्लक्षित पणामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर प्रवाशांचे अपंगत्व आणि जीवितहानी प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे