pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयात आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिन साजरा.

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. लेखन प्रेरणा दिन म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात आला.  विद्यार्थ्यांमधे वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्राचार्यांनी यावेळी महापुरुषांच्या चरित्र ग्रंथांचे वाचन करून आपण त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ. ए. के.गायकवाड (भूगोल विभाग प्रमुख ) यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना फकीरा, वैजयंता या कादंबरीतील अन्यायाविरुद्धचा लढा विद्यार्थ्यांना सांगितला. तर डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम.जी. लोणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. अनुपमा कांबळे  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. ए.आर. चव्हाण, डॉ. एच. के. जगताप,प्रा. विनिता तांडेल, प्रा.पूजा गुप्ता, प्रा.दिपू यादव, प्रा.हन्नत शेख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे