pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

भगवान धनगे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण; हुतात्म्यांना अभिवादन

0 5 3 2 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

काजळा/प्रतिनिधी,दि.17

प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात श्री. भगवान गंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
१७ सप्टेंबर १९४८ हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस असून, निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक लढ्याची माहिती देत स्वातंत्र्य, लोकशाही आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील मुख्यध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे