pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;

0 4 7 7 1 4
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
उरण तालुक्यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धा – २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामुळे उरण तालुक्यात पुन्हा एकदा क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील शालेय तसेच खुल्या गटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंते, उद्योजक आणि क्रीडाप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत हा क्रीडा सोहळा पार पडणार आहे.
स्पर्धेअंतर्गत १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वीर सावरकर मैदान (लाल मैदान), उरण येथे फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता बोकडविरा चारफाटा (एस.एम.एस.ई. ग्रेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ), ता. उरण, जि. रायगड येथून “द्रोणागिरी महाराष्ट्र अभिमान दौड” वर्ष मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता मॅरेथॉन स्थळी आयोजित करण्यात आला असून, विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना उरण तालुक्यातील गुणवंत खेळाडू, कलाकार व युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय स्तरावर उरण तालुक्याचे नाव उज्ज्वल करणे या उद्देशाने करण्यात आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून संस्था सातत्याने विविध क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असून, यंदाचे २६ वे वर्षही त्याच परंपरेला साजेसे ठरणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष महादेव घरत, उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे, महिला विभाग प्रमुख वैशाली घरत तसेच द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, महिला विभाग, युवक कार्यकर्ते आणि सभासद विशेष परिश्रम घेत आहेत.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने उरण तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व क्रीडाप्रेमी नागरिक, खेळाडू, युवक-युवती आणि शालेय विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. हा क्रीडा महोत्सव उरण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि युवा पिढीमध्ये क्रीडाभावना, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 7 1 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे