pub-7425537887339079
ब्रेकिंग

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ” देवमाणूस” या अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.

0 5 3 6 3 6
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
संघर्षाच्या जात्यावर स्वतःच्या आयुष्याचे पीठ करून कष्टकरी शेतकरी, श्रमजीवी जनतेला भाकरी देऊन स्वाभिमानाचे जीवन जगण्याचे  सामर्थ्य देणारे लोकनेते दि.बा.पाटील यांच्या प्रति आदर व कृतज्ञता या भावनेतून, आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ नामकरण करावे अशी मागणी येथील भूमीपुत्रांची व रायगड,ठाणे जिल्ह्यातील जनतेची आहे.तेव्हा केंद्र सरकारने लोकांच्या जनभावनेचा आदर करावा असे आवाहन शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांनी रायगड तोफच्या ” देवमाणूस” या अंकाच्या प्रकाशन समारंभात केले.
      उरण येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत ठाकूर यांच्या कल्पक पुढाकाराने रायगड तोफच्या देवमाणूस या अंकाचे प्रकाशन शेकापचे उरण  तालुका चिटणीस मा.रवी घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी उरण तालुका शेकाप प्रणीत सेवा निवृत्त संघटनेचे  अध्यक्ष मा.डी.आर . ठाकूर हे अध्यक्षस्थानी होते.तर सुहास घरत विद्यमान उपाध्यक्ष, यशवंत ठाकूर, कार्याध्यक्ष, काशिनाथ भोईर, सचिव, दत्ता घरत, सल्लागार, मनोहर पाटील, खजिनदार, प्रकाश पाटील, रमेश कोळी,भ.पो.म्हात्रे, स .ही.पाटील आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी रवी घरत पुढे म्हणाले की, ज्या भूमीत हे विमानतळ उभे आहे ती भूमी दि.बा.पाटील यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे.येथील भूमीपुत्रांनी त्यांना पाचवेळा आमदार व दोनवेळा खासदार म्हणून निवडून दिले आहे.तसेच विमानतळ नामकरण बाबत महाराष्ट्र राज्य विधानसभा व विधानपरिषदेत एकमताने लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ नामकरण करावे असा ठराव घेऊन तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.पण अजून पर्यंत नामकरण करण्यात आले नाही.याचे लोक दु:खी भावना व्यक्त करीत आहेत.तेव्हा केंद्र सरकारने लोकांच्या जनभावनेचा आदर करावा. असे आवाहन रवी घरत यांनी केले. यावेळी अध्यक्ष डी. आर ठाकूर व दत्ता घरत यांनी सदर विमानतळाचे नामकरण करून जनभावनेचा आदर करण्याचे आवाहन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रायगड तोफचे संस्थापक संपादक रामचंद्र म्हात्रे यांनी केले तर यशवंत ठाकूर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.सदर कार्यक्रमास प्रकल्पग्रस्त भूमीपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे