pub-7425537887339079
ब्रेकिंग

८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले.

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरणमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ८ वर्षीय अक्षर दिपाली चेतन पाटील याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १ वाजून ५९ मिनिटांनी अटल सेतूजवळून समुद्रात झेप घेत त्याने ४ वाजून २९ मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया गाठले. १७ किमीचे अंतर त्याने २ तास २९ मिनिट २९ सेकंदात पूर्ण केले. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली. उरण तालुक्यातील केगांव गावचा रहिवासी असलेला अक्षर पाटील हा परिवार, ‘सी स्विमिंग टीम’ आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत पोहला. या वयात केलेल्या कामगिरीमुळे उरण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे