पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण. मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरण तालुक्यातील पाव भाट बोरी येथील रहिवाशी १५ वर्षांपासून विजेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.बोरी पाव भाट येथे सिंगल फेज विद्युत नागरिकांना मिळत आहे गेले पंधरा वर्षापासून हे नागरिक एमएसईबी उरण येथे ट्रिपल फेस विद्युत पुरवठा मिळावा म्हणून मागणी करत आहेत . नागरिकांकडे सिंगल फेज असल्यामुळे फ्रीज टीव्ही व इतर उपकरणे व्यवस्थित चालत नाही. विद्युत पुरवठा कमी असल्यामुळे अनेक वेळा अनेक उपकरणे बिघडून जात आहे. याबाबत अनेक वेळा त्यांनी तक्रार केली आहे बैठका झाल्या आहेत, पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडे थ्री फेज लाईन आली नाही स्थानिक एक कुटुंबाचा विरोध आहे की त्यांच्या घरा च्या समोर च्या रस्त्यावरून लाईन टाकू देत नाही. एमएसईबी चे कर्मचारी पोल टाकायला येतात आणि हे कुटुंब त्याला विरोध करतो एमएसईबीचे लोक निघून जातात यावरून अनेक वेळा तणावाचे वातावरण झाले आहे.याचा त्रास इतर नागरिकांना होत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठपुरावा सुरु केला आहे.मागणी मान्य न झाल्यास ५ जून रोजी काँग्रेसच्या वतीने कोटनाका येथील एम एस ई बी वीज महावितरणच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता जी काय अडचण असेल ती एमएसईबी पोलिसांच्या सहकायनि दूर करून आम्हाला थ्री फेस लाईन टाकून दिली पाहिजे. प्रशासनाने लक्ष घालून एमएसईबी व उरण पोलीस यांची बैठक बोलून यातून मार्ग काढावा अशी मागणी काँग्रेस तर्फे माजी नगरसेवक बबन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




