pub-7425537887339079
ब्रेकिंग

एससी उपवर्गीकरणाविरोधात जाफ्राबाद येथे २८ जुलै रोजी विराट जनआक्रोश मोर्चा समन्वय समितीने केले एस.सी प्रवर्गातील नागरिकांना हजारोंच्या संख्येने सहभागाची होण्याचे

0 4 6 0 6 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.12

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफ्राबाद येथे मंगळवार,दि.२८जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन समस्त बौद्ध समाज व एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती,ता.जाफ्राबाद,जि.जालना यांच्या वतीने करण्यात आले असून,तालुक्यातील हजारो समाजबांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आयोजकांच्या मते,अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणारा असून,संविधानाने दिलेल्या समान हक्कांच्या तत्त्वाशी विसंगत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा,या प्रमुख मागणीसाठी हा विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चामध्ये तालुक्यातील विविध गावांतील बौद्ध समाज,सामाजिक संघटना,युवक,महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असून,त्यानंतर शासनाच्या नावाने तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. एससी उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन समस्त बौद्ध समाज व एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती, ता.जाफ्राबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्चाचा विशेष म्हणजे समन्वयकापैकी कोणीही सूत्रसंचालन करणार नाही,मुख्य विचार मंचावर बसणार नाही,कोणीही स्वागत किंवा सूत्रसंचालन करणार नाही, कोणीही स्वतःला व्हीआयपी म्हणून समाजापेक्षा वेगळ्या असणावर बसणार नाही त्याचबरोबर निवेदन देताना समाजाच्या वतीने लहान बालके देणार संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन. दरम्यान, उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मागील २५ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर दररोज एक-एका गावातील महिला आणि पुरुष यांच्या सामुदायिक सहभागात समस्त बौद्ध समाज बांधवांच्या सहभागातून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. जाफ्राबाद तालुका समन्वय समिती समन्वयक विजय खरात

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे