pub-7425537887339079
ब्रेकिंग

इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत अदिती राय प्रथम.

0 4 8 3 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

जिल्हा परिषद, पंचायत समिती जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बिट लेव्हल इंग्लिश एलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अदिती नीरज राय हिने प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. अदितीने आपल्या प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला. तिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अदितीला या स्पर्धेसाठी विद्यालयातील शिक्षक संदीप इंगोले यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, सचिव चंद्रशेखर वाघमारे, उपाध्यक्ष जगदीश बडवे, संचालक डॉ. विनायक दसरे, नितिन कोळेश्वर , रावसाहेब अवघड, भगवान धोत्रे, जुगलकिशोर भक्कड ,तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मीनाक्षी कुलकर्णी यांनी अदिती रायचे अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अदितीच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे