pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर.

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या “उपाध्यक्ष” या महत्त्वपूर्ण पदावर जगदीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आली असून, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सहकार्याने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच संघटनेचे अध्यक्ष डेव्हिड जेरी आणि उपाध्यक्ष राजा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. जगदीश ठाकूर हे संघटनात्मक कामात सक्रिय, मेहनती आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे मावळ लोकसभा क्षेत्रातील माथाडी आणि सर्वसाधारण कामगारांना एक सक्षम, तत्पर आणि लढाऊ नेतृत्व मिळाले आहे. कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि कल्याणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून जगदीश ठाकूर हे संघटनेला अधिक बळकट करतील, कामगारांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवतील आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करताना ते सर्व स्तरांवरील कामगारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी नवे उपक्रम राबवतील, अशी अपेक्षा आहे. या नियुक्तीबद्दल जगदीश ठाकूर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून विविध क्षेत्रातून तसेच सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पुढील कार्यकाळासाठी त्यांना सर्वांनीच हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे