pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्याtपीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार तसेच प्राचार्या डॉ. सविता सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफ्राबाद येथे आज रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व महाविद्यालयांनी एकाच वेळी योग कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महाविद्यालयात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील मेढे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांचा समावेश होता. योग प्रात्यक्षिके घेण्याचे काम प्रा. डॉ. पी. जे. मिसाळ यांनी केले. त्यानंतर प्रा. डॉ. पी. जे. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यापीठाच्या सूचनांनुसार सूक्ष्म हालचाली, सूर्यनमस्कार, विविध योगासने व प्राणायामाचा समावेश असलेला योगाभ्यास करण्यात आला. प्रत्येक आसनाचे महत्त्व, त्याचे शरीरावर होणारे परिणाम तसेच योग्य पद्धतीने योगाभ्यास करण्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमात प्रा. डॉ. सतीश ठोंबरे, ग्रंथपाल अशोक पठाडे, प्रा. डॉ. एस. डी. पाटील, प्रा. यू. वाय. वाघ, प्रा. एस. डी. पैठणे, प्रा. शैलीप्रकाश वाघमारे, प्रा. डॉ. एस. आर. पहारे, प्रा. डॉ. जितेंद्र वाघ, अशोक जाधव, गणेश आढावे, रवींद्र उजेड, दादाराव गायकवाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. “नियमित योग केल्याने ताण-तणाव दूर होऊन एकाग्रता वाढते,” असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. पी. जगतवाड यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक योगसाधना व निरोगी जीवनाचा संकल्प करून करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे