शिक्षण महर्षी मा.दादासाहेब म्हस्के साहेब यांचा आदर्श घेऊन कामगारांची दिवाळी साजरी गोड करणारा अंकुश मघाडे..

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.9
जाफराबाद तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील सर्व साधारण कुटुंबातील अतिशय प्रतिकुल परीस्थितीचा सामना करुन स्वतःच्या कुटुंबाची एका वेळची भूक सुध्दा मजुरी आभावी भरता येत नव्हती.अशा कठिण परिस्थितीत अंकुश मघाडे यांना सिध्दार्थ महाविद्यालयाचे काम देऊन दादासाहेब म्हस्के साहेबांनी एक संधी दिली. त्यांना काम देऊन दादासाहेबांनी एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीला उभं करुंन समाजात ताठ मानेने उभे करण्यासाठी जणू समाज बांधवांना विश्र्वासच दिला.श्री अंकुश मघाडे यांनीही दादासाहेब म्हस्के साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता खरोखरच सिध्दार्थ महाविद्यालय हे माझेच नाही तर माझ्या कुटुंबासोबत माझ्या वीस ते पंचवीस कुटुंबाला आधार देणारे सिध्दार्थ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के यांची समाजासाठी अविरतपणे सहकार्याचा हात पुढे करतांना मी पाहिले.म्हणुन मी रोज मोल मंजुरी करुन कुटुंबाला ज्या कामगाराच्या कष्टाने त्यांच्या सहकाऱ्यांनी पोट भरतो अशा कामगारांची दिवाळी गोड साजरी व्हावी म्हणून मी शिक्षण महर्षी मा.दादासाहेब म्हस्के साहेबांचा आदर्श घेऊन व माझ्या जीवनात मी ज्यांना माझे आदर्श,माझे अन्नदाता, समाजासाठी अविरतपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ठाम राहुन मराठवाड्यातील शिक्षणापासून वंचित बहुजन समाज बांधवांच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे हाडा मासाचे शिक्षण महर्षी मा.दादासाहेबांचा आदर्श समाज बांधवांनी पुढं चालू ठेवाव..हि विनंती करतो.व सर्वांना माझे अन्नदाता शिक्षण महर्षी मा.दादासाहेबांनी माझ्या कुटुंबासाठी जो दिवा दिपदान व दिपावलीच्या निम्मित माझ्या व माझ्या कामगाराच्या घरात लावला असाच एक दिवा समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पुढं नेणाऱ्या सर्वांसाठी लावावा.हिच अपेक्षा करतो….. माझ्या व माझ्या कामगाराच्या घरात आनंदाची दिवाळी सन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सविता सिनगारे ताई, त्यांचे धर्म पति व सिल्लोड शिक्षण संस्थेची खऱ्या अर्थाने धुरा समर्थपणे व धाडसाने सांभाळणारे संस्थेचे सचिव प्रा डॉ राहुलजी म्हस्के यांच्ये ऋण फेडण्यासाठी अविरतपणे महाविद्यालयासाठी सतत सहकार्य करावे असे आवाहन मी एक भिम सैनिक व छोटा गुत्तेदार अंकुश मघाडे करतो…..
